ladki bahin yojana hafta date ; मागच्या महिन्यात का आले नाहीत?लाडकी बहीण हप्ता खरंच मिळणार आहे का?
अशा अनेक प्रश्नांनी आपल्या लाडक्या बहिणींच्या मनात गोंधळ चालूच होता. पण आता सरकारकडून दिलासा देणारी बातमी आली आहे लाडकी बहिण योजना अंतर्गत मे महिन्यात काही निवडक महिलांना थेट 3000 रुपये मिळणार आहेत!
काय आहे ही योजना?
राज्य सरकारनं सुरू केलेली ही योजना म्हणजे गरीब, गरजू आणि काम करणाऱ्या महिलांसाठी एक आधारस्तंभ आहे.
महिन्याला 1500 रुपयांचा हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होतो, जेणेकरून त्यांना स्वतःच्या गरजा भागवता येतील, थोडं आर्थिक स्वावलंबन मिळेल.
कधी मिळणार 3000 रुपये….
खरं सांगायचं तर, एप्रिल महिन्यात काही महिलांच्या खात्यात हप्ता वेळेवर जमा झाला नाही.
त्यामुळे यावेळी सरकारनं ठरवलं आहे की मागच्या महिन्याचा आणि या महिन्याचा हप्ता एकत्र करून 3000 रुपये दिले जातील.
हे पैसे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.
बँकेकडून किंवा DBT (Direct Benefit Transfer) द्वारे हे पैसे तुमच्या खात्यात थेट जमा होतील.
कोणाला मिळणार हा हप्ता?
ज्यांना एप्रिलमध्ये हप्ता मिळाला नव्हता, त्यांना आता 1500 + 1500 = एकूण 3000 रुपये मिळतील.
ज्यांना मागच्या वेळी पैसे मिळाले होते, त्यांना यावेळी फक्त 1500 रुपये मिळतील.
पैसे आलेत का, हे कसं कळेल?
बँक मेसेज/SMS तपासा
मोबाईल बँकिंग किंवा ATM वरून बॅलन्स चेक करा
बँकेत जाऊन खात्यावर एंट्री करून घ्य
महिला व बालविकास विभाग यांची वेबसाइट/अॅपही उपयुक्त ठरू शकते
पैसे न मिळाल्यास काय करायचं?
खातं आधारशी लिंक आहे का, ते खात्री करा
नाव, पत्ता किंवा इतर माहिती अर्जात चुकीची तर नाही ना, ते बघा
आपल्या ग्रामसेवक, तलाठी किंवा महिला बालविकास केंद्राशी संपर्क करा
‘लाडकी बहिण’ ही केवळ एक योजना नाही. ती राज्य सरकारकडून तुमच्यासारख्या कष्टकरी महिलांना दिलेली एक छोट्या मदतीची, पण मोठ्या मान्यतेची भेट आहे.
हे पैसे मिळाले, तर त्याचा योग्य वापर करा. काही अडचण वाटली, तर लाजू नका. विचारून घ्या, कारण हा तुमचा हक्क आहे!