
Ladaki Bahin Yojana:लाडकी बहीण योजनेचा १३ हप्ता रक्षा बंधनाच्या मुहूर्तावर मिळणार त्याच सोबत मिळणार हे गिफ्ट?
लाडकी बहीण गिफ्ट महाराष्ट्र सरकारने महिलांच्या आर्थिक समीकरणासाठी सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी एक उपयुक्त ठरले आहे या योजनेतील महिलाला दरमहा पंधराशे रुपये यांची आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत 12 हप्ते वितरित झाले असून आता तेरावा हप्ता रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर म्हणजेच 9 ऑगस्ट रोजी पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे.
रक्षाबंधन बंधन ला मिळणार लाडक्या बहिणीला गिफ्ट
या निर्णयामुळे महाराष्ट्रातील कोट्यावधी महिलांना रक्षाबंधन सण हा आनंदाने साजरा करता येणार आहे महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याला चालना देण्याच्या दृष्टीने सरकारकडून घेतलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना केवळ आर्थिक मदत नाही तर त्यांना स्वावलंबी बनण्याची संधी देखील मिळते.
योजनेचा उद्देश व सामाजिक परिणाम
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे आणि त्यांचे जिवनमान उंचावणे या योजनेचा लाभ 21 ते 65 वयोगटातील गरीब व गरजू महिलांना मिळतो आतापर्यंत सुमारे 2.41 कोटी महिलांना या योजनेचा लाभ घेतला आहे अनेक महिला या पैशाचा उपयोग स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी घर खर्च व इतर मूलभूत गरजा भागवण्यासाठी करत आहेत.
Ladki bahan Yojana; तेराव्या हप्त्याची तारीख बदल आता मिळणार 9 ऑगस्ट रोजी
सुरुवातीला जुलै महिन्याच्या हप्ता सहा ऑगस्ट रोजी वितरीत होणार होता मात्र रक्षणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हप्त्याची तारीख पुढे ढकलून नऊ ऑगस्ट केले आहे यासाठी राज्य सरकारने 2.984 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे त्यामुळे महिलांना रक्षाबंधनाच्या दिवशी आर्थिक भेट स्वरूपात जुलै महिन्याचा हप्ता मिळणार आहे म्हणजेच जुलै व ऑगस्ट चे हप्ते एकत्र मिळणार असल्याचा अफवा खोटे आहेत सरकारने स्पष्टपणे सांगितले आहे की नऊ ऑगस्टला फक्त जुलै चा हप्ता वितरण केला जाईल जुलै चा हप्ता हा नऊ ऑगस्टला मिळणार आहे.
लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या महिला पात्र आहेत.
1 वय 21 वर्षे ते 65 वर्ष दरम्यान असणे आवश्यक
2 उत्पन्न कुटुंबाचे वार्षिक 2.5 लाख रुपये पेक्षा कमी असावे
3 बँक खाते आधार लिंक केलेले आणि सक्रिय खाते असणे गरजेचे आहे
4 ती महिला महाराष्ट्रातील कायम निवास रहिवासी असणे आवश्यक आहे.
5 वैवाहिक स्थिती विवाहित. अथवा विधवा घटस्फोटित किंवा अविवाहित महिला अर्ज करू शकतात.
तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आम्हाला कमेंट मध्ये कमेंट करून नक्की सांगा व तुम्हाला आतापर्यंत हप्ता आला आहे का नाही हे पण कमेंट मध्ये सांगा.